Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Solapur › राष्ट्रवादी महिलाच्यावतीने वाढत्या अत्याचाराबाबत मूक आंदोलन

राष्ट्रवादी महिलाच्यावतीने वाढत्या अत्याचाराबाबत मूक आंदोलन

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:08PMसोलापूर : प्रतिनिधी

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिला, मुली आणि वृद्ध महिलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महिला सुरक्षित नसून भाजप सरकार महिलांची सुरक्षा ठेवण्यात अपयशी ठरल्याचा निषेधार्थ सोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने गुरुवारी चार हुतात्मा पुतळा येथे मूक आंदोलन करण्यात आले. जिल्हा निरीक्षक निर्मला बाविकर, शहराध्यक्षा नगरसेविका सुनीता रोटे आणि ग्रामीणच्या अध्यक्षा मंदाताई काळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याऐवजी जाहिरातबाजीत दंग आहे. आज एखादी महिला रस्त्यावरून जाताना सुरक्षित घरी जाईल याबाबत शंका निर्माण झाल्याचे निरीक्षक निर्मला बाविकर यांनी सांगितले.

 महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत महाराष्ट्राच नाही तर देशातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्षा सुनीता रोटे यांनी केला. ग्रामीण अध्यक्ष मंदाताई काळे यांनीसुद्धा सरकारच्या महिलांविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. भाजप सरकारच्या या अकार्यक्षम कारभारामुळे महिलांनीच महिलांची सुरक्षा करण्याची वेळ सरकारने सर्व महिलांवर आणल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंगलाताई कोल्हे, लता ढेरे, बार्शी अध्यक्ष उषा गरड, मंगल शेळवणे, करुणा हिंगमिरे, उल्का गायकवाड, शामल काशीद, गोकर्णा डिसले, संगम्मा सगरे, उज्ज्वला पाटील, अंजली मोरे, लक्ष्मी पवार, शशिकला भरते, रेश्मा यादव, अनिता पवार, रंजना हजारे, प्रतिभा गायकवाड, संपता निचळ, यशोदा कांबळे, सिंधू वाघमारे, कल्पना खंदारे, सुनीता धोत्रे, सुरेखा पाटील, लक्ष्मी भोसले, नागरबाई चवरे, नैना तोडकरी, संगीता चाफाकारंडे, रुक्मिणी गायकवाड, कल्पना मसळे, विजया सावंत, हिरबाई शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.