Thu, Apr 25, 2019 07:57होमपेज › Solapur › सोलापुरात महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग

सोलापुरात महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:12PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

  ग्रामीण पोलिस दलातील महिला कॉन्स्टेबलचा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विनयभंग केल्याची तक्रार जेलरोड पोलिसांत नोंद झाली आहे. सागर खंदारे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 2 डिसेंबर रोजी महिला कॉन्स्टेबल ड्युटी संपून घरी आल्या. सागर खंदारे व त्यांची ओळख आहे. त्यामुळे दोनदा भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे बोलणे झाले होते. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये सागरचा मोबाईल क्रमांक नोंद होता.

3 डिसेंबरच्या सकाळी कॉन्स्टेबल यांनी आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप उघडले असता त्यामध्ये सागरने लज्जा वाटेल अशा शब्दांतील मजकूर पाठविला होता. यापूर्वीदेखील 24 नोव्हेंबरपासून सागरने अनेक वेळा असे मेसेज पाठविले होते. परंतु, कॉन्स्टेबल यांनी दुर्लक्ष केले होते. रविवारी सागर फोन करून अधिक त्रास देत होता. शेवटी  कॉन्स्टेबलने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.