Sat, May 30, 2020 03:21होमपेज › Solapur › 'ऑनलाईन'मध्ये सहा जिल्हयात मोहोळ ठरला पथदर्शी तालुका

'ऑनलाईन'मध्ये सहा जिल्हयात मोहोळ ठरला पथदर्शी तालुका

Published On: Dec 26 2017 8:53PM | Last Updated: Dec 26 2017 8:53PM

बुकमार्क करा

मोहोळ: महेश माने 

महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेखाचे संगणकीकरण हा महत्वकांक्षी प्रकल्प राज्यभर राबविला होता. सदर प्रकल्पाअंतर्गत मोहोळ तालुक्यातील 104 गावातील एकूण 95 हजारांपेक्षा जास्त 7/12 उतार्‍यांचे संगणकीकरण पुर्ण झाले असुन खातेदारांना आता बिनचूक 7/17 व 8अ चे उतारे ऑनलाईन मिळण्यासाठीची कार्यवाही मोहोळ तालुक्याने पूर्ण केली आहे. तसेच मोहोळ तालुका हा हे काम पुर्ण करणारा जिल्ह्यातीलच नव्हे तर पुणे विभागातील पहिला तालुका ठरला असल्याची माहिती मोहोळचे तहसिलदार बी.आर तथा अमित माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हस्तलिखित अधिकार अभिलेख संगणकीकृत अधिकार अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी ई फेरफार आज्ञावली अद्यावत डाटा मूळ हस्तलिखित अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी शासनाच्या वतीने एडिट व रिएडीट मोडून विकसीत करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने महसुल अधिकार अभिलेख नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे, तसेच 7/12 व 8अ गावातील चावडी ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. यात एकुण तीन टप्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात सेतू केंद्र, महा ईसेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल, तसेच गावकामगार तलाठी यांच्या माध्यमातून गावनिहाय खातेदारांनी आपले 7/12 प्राप्त करुन घेतले होते. त्यामध्ये काही आक्षेप आढळल्यास तलाठी अथवा तहसिलदार यांच्याकडे रितसर अर्ज करुन तक्रारी दाखल करण्याची संधी खातेदारांना देण्यात आली होती. दुसर्‍या टप्प्यात सदरचे संगणकीकृत 7/12 उतारे चावडीवाचनाच्या माध्यमातुन खातेदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते. तसेच काही चुका आढळल्यास संबंधीत तलाठ्या मार्फत दुरुस्त करुन नव्याने 7/12 उतार्‍यांच्या प्रिंन्ट खातेदारांना देण्यात आल्या होत्या. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याच्या अनुषंगाने तिसर्‍या टप्पा राबविण्यात आला होता. यामध्ये तलाठी यांनी 100 टक्के, मंडल अधिकारी यांनी 30 टक्के, नायब तहसिलदार यांनी 10 टक्के, तहसिलदार यांनी 05 टक्के, उपविभागीय अधिकारी यांनी 03 टक्के तर जिल्हाधिकार्‍यांनी 01 टक्का पाहणी करुन सदरचा अभिलेख बिनचुक बनविण्यासाठीची कार्यवाही पुर्ण करण्यात आली होती.

या सर्व शासकीय प्रक्रियेत मोहोळचे तहसिलदार बी.आर तथा अमित माळी यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने हि महत्वपुर्ण प्रक्रिया बिनचुक पुर्ण करुन घेतली होती. त्यामुळेचे मोहोळ तालुका हा या कामात सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर पुणे विभागात नंबर वन ठरला आहे. हे रि एडीटचे काम पुर्ण करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. तर सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तल्कालीन उपविभागी अधिकारी संजय तेली यांनी या कामाचा वेळोवेळी आढावा घेऊन योग्य प्रकारे पाठपुरावा व मार्गदर्शन केले होते. त्यासाठी त्यांनी कार्यशाळा व बैठका घेऊन संबंधित यंत्रणेच्या शेवटच्या घटकांपर्यंत मार्गदर्शन करुन मोलाची भुमिका बजावली होती.

मोहोळचे तहसिलदार बी.आर तथा अमित माळी यांनी या कामासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी डीबीए म्हणून नियुक्त असणार्‍या नायब तहसिलदार जिवन क्षीरसागर आणि किशोर बडवे यांच्या मदतीने वेळोवेळो आढावा बैठका आयोजित केल्या होत्या. त्यांनी महसुल कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून बिनचुक काम करुन घेतल्यामुळे सुरुवाती पासुनच मोहोळ तालुका पुणे विभागात रि एडीटच्या कामात अग्रस्थानी राहिला होता. सदरचे काम पुर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मोहोळ तालुका पुणे विभागात नंबर वन आल्याचे जाहिर करण्यात आले. त्यामुळे मोहोळचे तहसिलदार बी.आर तथा अमित माळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.