Fri, Jul 19, 2019 18:11होमपेज › Solapur › उद्याचा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा : धनंजय मुंडे

उद्याचा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा : धनंजय मुंडे

Published On: Apr 06 2018 7:39PM | Last Updated: Apr 06 2018 7:39PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

आज भाजपची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. मात्र आजच्या महामेळाव्यात त्‍यांनी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लक्ष केलं. यावरून स्पष्ट होतं की उद्याचा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. असे प्रतिपादन कॉग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले. हल्‍लाबोल यात्रेत मोहोळ येथील सभेत ते बोलत होते.

राष्‍ट्रवादी कॉग्रेसच्या हल्‍लाबोल यात्रेच्या आज पाचव्या दिवशी सोलापूर जिल्‍ह्‍यातील मोहोळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. लोक या सरकारला खूप हैराण झाले आहेत. कधी निवडणूक येईल आणि कधी या युती सरकारला खाली खेचू अशी मानसिकता लोकांची झाली आहे असे सांगत येणाऱ्या काळात जनता या सरकारला धडा शिकविल्‍याशिवाय राहणार नाही असे ते म्‍हणाले. 

सरकारने लोकसभा निवडणुकांच्यावेळी दिलेले आश्वासने पूर्ण केले नाहीत पण प्रत्येक वर्षी नवा आघात जनतेवर केला जात आहे. यामुळे जनता आता या सरकारच्या धोरणांना कंटाळली आहे. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने तर गरीब जनतेचे कंबरडे मोडले. अनेक उद्‍योग बंद पडले. या सरकारला शेतकऱ्यांची जात नष्ट करायची आहे. म्हणून शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत. असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.