Sun, Jun 16, 2019 02:47होमपेज › Solapur › आ. रुपनवर-सीईओ डॉ. भारूड यांच्यात शाब्दिक चकमक

आ. रुपनवर-सीईओ डॉ. भारूड यांच्यात शाब्दिक चकमक

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 10:19PMसोलापूर : प्रतिनिधी

विधानपरिषदेचे आ. रामहरी रुपनवर व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्यात मंगळवारी सायंकाळी प्रचंड शाब्दिक चकमक झाली. माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यावरून हा वाद दोघात पेटला. आ. रुपनवर यांनी डॉ. भारूड यांच्यावर हक्कभंग आणण्याचा इशारा देत जिल्हा परिषदेतून रागातून बाहेर पडल्याने यावेळी चांगलीच चर्चा झाली. 

माळशिरसचे गटविकास अधिकारी यांच्यासंबधी असणार्‍या तक्रारीबाबत आ. रुपनवर यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. भारूड यांना पत्र दिले होते. याप्रकरणी चौकशी करून गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात कोणती कारवाई झाली याची माहिती घेण्यासाठी आ. रुपनवर डॉ. भारूड यांना भेटण्यासाठी आले होते. 

गटविकास अधिकारी यांच्याबाबत असणार्‍या तक्रारीत अनेक विषय आहेत. मात्र कारवाई करण्यासारखी नेमकी माहिती देण्यात यावी, त्यानुसार कारवाई करण्यात येईल. गटविकास अधिकारी यांच्या तक्रारीबाबत राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्याची भूमिका डॉ. भारुड यांनी घेतली. मात्र आमदारांच्या पत्राची दखल घेण्यात येत नाही अशी भूमिका घेत हक्कभंग आणण्याचा इशारा आ. रुपनवर यांनी दिला असल्याचे या घटनेनंतर डॉ. भारुड यांनी सांगितले.