Tue, Jul 16, 2019 10:14होमपेज › Solapur › आ. कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर बाजार समितीसाठी पॅनेल

आ. कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर बाजार समितीसाठी पॅनेल

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 9:06PMसोलापूर : प्रतिनिधी   

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या सर्वच जागा आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याची माहिती जावेद पटेल आणि संतोष टोणपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मोहोळ विधानसभेेचे आमदार रमेश कदम यांच्या मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावे सोलापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे आ. कदम यांनी केलेल्या कामांचा ठसा सध्या उत्तर सोलापूर तालुक्यात आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. कदम यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच कोणी सोबत येवो अथवा न येवो ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असून इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी संतोष टोणपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. दरम्यान, या पॅनेलमुळे निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.