सोलापूर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गरोदर केल्याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात दिनेश अंबादास नाटेकर (रा. नळ बझार चौक, डाळ गल्ली, उत्तर सदर बझार) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जून 2017 मध्ये संशयित आरोपी दिनेश नाटेकर याने एका अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार करून गरोदर केले होतेे. पीडित मुलीच्या आईने पुणे येथील एका सामाजिक संस्थेत दाखल केले. संस्थेच्या वतीने 21 डिसेंबर रोजी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.