Sun, Apr 21, 2019 14:06होमपेज › Solapur › महापौरांचे बोलणे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’

महापौरांचे बोलणे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:18PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी ते सोलापूर संमातर पाईपलाईनसाठी दोन्ही मंत्र्यांनी पाठपुरावा करून निधी खेचून आणावा. आपण त्यांचा जाहीर सत्कार करू, असे आवाहन केले होते. मात्र स्मार्ट सिटी आणि एनटीपीसीने दिलेला निधी आम्ही मंजूर करून आणला, असे महापौर सांगत आहेत. त्यामुळे महापौरांचे हे बोलणे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’ असे असल्याचा आरोप माजी महापौर यु.एन. बेरिया यांनी केला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी आपली राजकीय ताकद वापरून सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र आणि समांतर पाईपलाईनसाठी निधी आणावा, असे आवाहन केले होते. त्यावर रुपयांचाही निधी न आणता पाईपलाईनच्या कामाला मंजुरी मिळाली असून सत्कारासाठी बेरियांनी तयार राहावे, असे आवाहन महापौर शोभा बनशेट्टी केले आहे. त्याचा बेरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. महापौर बनशेट्टी या 492 कोटी रुपये आणल्याचा कांगावा करत आहेत. हे पैसे स्मार्ट सिटी योजनेतून 200 कोटी आणि एनटीपीसीकडून 250 कोटी मिळाले आहेत. यामध्ये विद्यमान मंत्र्यांचा काडीमात्र संबंध नाही. दोन्ही मंत्र्यांनी केवळ आपापले मतदारसंघ सांभाळण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्याचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सोलापूर शहराच्या विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांनी पूर्वी केलेल्या कामावरच सोलापूर शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली असल्याचे बेरिया यांनी यावेळी जाहीर केले.