Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Solapur › संचालकांना अंतिम आदेशापर्यंत जामीन

संचालकांना अंतिम आदेशापर्यंत जामीन

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 10:02PMसोलापूर : प्रतिनिधी

बाजार समितीमध्ये अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संचालक व सचिव यांना मूळ अटकपूर्व जामीन अर्जांचा निकाल लागेपर्यंत अंतरिम जामिनाचा आदेश सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी दिला. मूळ अर्जांची पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपहार 39 कोटी रुपयांचा केल्याप्रकरणी लेखापरीक्षक संजय काकडे यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिस ठाण्यात तत्कालीन सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सभापती व संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी 17 संचालकांना 11 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 12 जून रोजी सत्र न्यायालयात मूळ अर्जांच्या सुनावणी वेळी व निकालावेळी सभापती व संचालक यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; परंतु सभापती व संचालक यांच्यामार्फत 13 जून रोजी अर्ज देऊन संचालकांना अंतरिम जामीन मंजूर करावा व मुख्य जामीन अर्ज नामंजूर झाल्यास निकालानंतर त्यांना 5 दिवसांचा अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने अर्जदारांचा अंतरिम जामीन मागणी अर्ज मंजूर केला. मूळ जामीन अर्जांचा निकाल होईपर्यंत अर्जदारांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला तसेच जामीन अर्जांच्या  सुनावणीच्या प्रत्येक तारखेस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. मूळ अर्जांची पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे.

याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. प्रदीपसिंग रजपूत यांनी, तर दिलीप माने, इंदुमती अलगोंडा-पाटील, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सोजर पाटील, उत्तरेश्‍वर घुटे, ऊर्मिला शिंदे यांच्यावतीने  अ‍ॅड. धनंजय माने,  अ‍ॅड. जयदीप माने, तर नागराज पाटील, शंकर येणेगुर, चंद्रकांत तुपसुंगे, रजाक शेख, अहमद निंबाळे, अशोक देवकते, पिरप्पा म्हेत्रे, धोंडीराम गायकवाड, बाळासाहेब शेळके यांच्यावतीने अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, तर सचिव धनराज कमलापुरे, उमेश दळवी यांच्यावतीने अ‍ॅड. भारत कट्टे काम पाहात आहेत.