होमपेज › Solapur › सोलापूरात आंदोलक संतप्त; उद्या मंत्र्यांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन

सोलापूरात आंदोलक संतप्त; उद्या मंत्र्यांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन

Published On: Jul 26 2018 2:16PM | Last Updated: Jul 26 2018 2:16PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

पंढरपूर येथे वारीच्या निमित्ताने दहा लाख भविक असल्याने गेल्या दोन दिवसांपासून सौम्य आंदोलन सुरू होते. मात्र आता भाविक माघारी परतल्यानंतर आंदोलन तीव्र होत आहे. आज बार्शी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी आंदोलकांनी एसटी बस पेटवली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी येईपर्यंत बस जळून खाक झाली.

माढा येथे तहसिलदार कार्यालयासमोर जागरण, गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर करमाळ्यात आणि बोरामणीत रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. 

सोलापूरातील दोन्ही मंत्र्यांच्या घरासमोर आसूड ओढा आंदोलन

सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर शुक्रवारी सकाळी आसूड ओढो अंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली. 

मराठा आरक्षणच्या बाबत राज्यभरात आमदार राजिनामा देत आहेत. पंढरपूरच्या आमदारांनी जाहीर पाठिंबा देत मराठा आंदोलनासाठी आहुती दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व लाख रुपये मदत केली मात्र या जिल्ह्याचे पालकमंत्री व मराठा समाजाचे व समाजाच्या बळावर निवडून आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अद्याप मराठा मोर्चाबाबत त्यांची भुमिकाही स्पष्ट केली नाही. त्यामुळे सरकारचा व मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दोन्ही मंत्र्यांच्या घरासमोर आसूड मारो आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. या आंदोलनात मराठा आंदोलकांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.