Tue, Apr 23, 2019 08:05होमपेज › Solapur › सोलापूरमधील अपघातात बेळगाव जिल्‍ह्यातील एक ठार

सोलापूरमधील अपघातात बेळगाव जिल्‍ह्यातील एक ठार

Published On: Mar 22 2018 12:11PM | Last Updated: Mar 22 2018 12:17PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर गुरुवारी पहाटे सव्वा तीन वाजात थांबलेल्या टेंपो (क्र. एमएच १३ एएक्स ३०१५) ला  पाठीमागून धडक दिल्याने स्कॉर्पिओ (क्र. एमएच ०९ सीजे ९०००) मधील अण्णापा रामचंद्र गाडीवडर (वय 46) हे जागीच ठार झाले. या अपघातात बाबासाहेब पोकले, शिवाजी पाटील, श्रीकांत पाटील, अजित कोकणे, संतोष लिगाडे, कारिनाथ चौगुले हे जखमी आहेत. हे सर्वजण हालसिध्दनगर सौंदलगा (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील रहिवासी आहेत. 

या अपघातात चालक संतोष सुरेश लिगाडे(,रा. निपाणी) बाबासाहेब ऊर्फ पिंटू पोकले,(रा यमगरणी ता निपाणी) शिवाजी पाटील,(रा एकंडो ता कागल) श्रीकांत पाटील,(रा अतिग्रे ता' हातकंनगले) अजित कोकणे,(रा नानीबाई चीरवली ता. कागल) कारीनाथ आप्पासाहेब चौगुले (रा.हालसिध्दनगर सौंदलगा ता. चिकोडी, जि. बेळगाव) हे जखमी आहेत. 

मंगळवेढा मार्गे ते जळकोट (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील पोलिस स्टेशनकडे सोमवारी निघाले होते. या मार्गावर वाळूचा ट्रक पकडण्यात आला होता. यावेळी हा अपघात झाला. या अपघाताची फिर्याद किसन गाडीवडर यांनी मंगळवेढा पोलिसात तक्रार दिली आहे. जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Tags: solapur mangalwedha, road accident, saundlaga one death car accident