Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Solapur › माळशिरसमधील ४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदसाठी १७ तर सदस्यासाठी १०५ उमेदवार     

माळशिरसमधील ४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदसाठी १७ तर सदस्यासाठी १०५ उमेदवार      

Published On: Dec 14 2017 9:28PM | Last Updated: Dec 14 2017 9:28PM

बुकमार्क करा

माळीनगर  : वार्ताहर 

माळशिरस तालुक्यातील माळीनगर, धर्मपुरी, कारूंडे, वाफेगाव व  या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी १७ तर सदस्यपदांसाठी १०५ उमेदवारी अर्ज राहिले आहेत. सरपंच पदासाठी १७ उमेदवारांनी माघार तर सदस्य पदासाठीचे ६३ उमेदवारांनी माघार घेण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार बाई माने यांनी दिली. यावेळी नायब तहसिलदार काळे, लिपिक आर. बी. भंडारे , उमाकांत मोरे आदी उपस्थित  होते.

यंदा प्रथमच जनतेतून सरपंच निवडीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.