Thu, Jul 18, 2019 02:55होमपेज › Solapur › छ शिवाजी महाराजांच्या पालखीचे माळीनगरात स्वागत 

छ शिवाजी महाराजांच्या पालखीचे माळीनगरात स्वागत 

Published On: Jul 17 2018 8:25PM | Last Updated: Jul 17 2018 8:25PMमाळीनगर  : प्रतिनिधी 

स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे माळीनगर मध्ये आगमन झाले. माळीनगर मधील नागरिकांच्या  वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 
छत्रपती शिवाजी महाराज पालखीचे हे चौथे वर्ष असून किल्ले रायगड ते पंढरपूर अशी या पालखीचा मार्ग असतो. दरवर्षी प्रमाणे पालखीचा मुक्काम मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणातच  होणार असून पालखीच्या स्वागतानंतर  पालखीचे गोल  रिंगण येथील मैदानात पार पडते. या रिंगण सोहळ्यात दांडपट्टा, लाठी - काठी, तलवार बाजी, इ मर्दानी खेळातून रिंगण पार पडले. 

यावर्षी पालखी मध्ये तीस ते चाळीस तरूण शिवभक्त सहभागी झाले आहेत तसेच यामध्ये कुणीही मुख्य, प्रमुख असा भेद न ठेवता सगळेच जण पालखीचे नेतृत्व करत आहेत.दरवर्षी प्रमाणे माळी शुगर फॅक्टरी, मॉडेल हायस्कूल, ग्रामपंचायत, सकल मराठा समाज संघटना आणि विविध संघटनांनी चांगली सोय केली आहे यासाठी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. असे मत पालखीतील सदस्य गणेश माने, डॉ संदीप माईन, निशांत गोलांडे, शैलेश गुरव, केतन केमसे आदी शिवभक्तानी व्यक्त केले. माळीनगर मुक्काम झाल्यानंतर पालखी श्रीपूर कडे मार्गस्थ होणार आहे.