Wed, Nov 14, 2018 14:17होमपेज › Solapur › मनोहर डोंगरे हल्लाप्रकरण; मुख्य संशयित आरोपीस जामीन मंजूर

मनोहर डोंगरे हल्लाप्रकरण; मुख्य संशयित आरोपीस जामीन मंजूर

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 11:29PMसोलापूर :  प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी अ‍ॅड. कैलास खडके आणि प्रकाश गुंड यांना जामीन मंजूर झाला आहे. शुक्रवारी 22 जून रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी त्यांची जामीनावर सुटकाकेली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोहर डोंगरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात संशयित आरोपी म्हणून अ‍ॅड. कैलास निवृत्ती खडके आणि प्रकाश गुंड यांना अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. या हल्ल्याचा कट रचून हल्ला केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी अ‍ॅड. राज पाटील यांच्यामार्फत जामीन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता. या जामीनअर्जाच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. राज पाटील यांनी आरोपींना या प्रकरणात विनाकारण गुंतविले असल्याचे सांगून फिर्याद आणि फिर्यादी व साक्षीदारांचा सीआरपीसी 164 चा जबाब यामध्ये विसंगती असल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी 22 जून रोजी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.

 आरोपीतर्फे अ‍ॅड. राज पाटील, अ‍ॅड. एम. ए. इनामदार, अ‍ॅड. परदेशी, अ‍ॅड. सुरेश पवार, अ‍ॅड. ढमढेरे यांनी काम पाहिले, तर मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. हर्षल निंबाळकर यांनी बाजू मांडली.