Sat, Jul 20, 2019 23:39होमपेज › Solapur › महिला महोत्सवात रंगला लागीरं झालं जी....

महिला महोत्सवात रंगला लागीरं झालं जी....

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 10:21PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

’मला लई कॉन्फीडान्स हाय’ असं म्हणत अनेकांच्या भावनेला हात घालणारा राहुल्या आणि ’देअर यु आर... एकदाच सांगतोय पुन्हा सांगितलं म्हणून सांगायचं नाय..’ अस ठणकावून सांगणारा निगेटिव्ह रोल मधील भैय्यासाहेब चक्क झी मराठीच्या लागीरं झालं जी..’ मालिकेतून बाहरे पडत ’वॉव’ महिला महोत्सवाच्या रंगमंचावर आवतरले आणि त्यांच्या दिलखुलास गप्पांमुळे सोलापूरकरांचाच या कलावंतांशी जणू लागीरं झालं जी...

  आरएनए इव्हेंटज आयोजित ’वॉव’ महिला महोत्सवाचा समारोपाच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीवरील लागीरं झालं जी मधील अभिनेते राहूल मगदूम यांची मुलाखत झाली. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.

 8 ते 11 डिसेंबर दरम्यान तीन दिवस रगंलेल्या या महोत्सवात 40 स्टॉल्सला सुमारे 15 हजाराहून अधिक लोकांनी भेट दिली. यावेळी आरएनए च्या संचालिका राही होमकर-आरसीद, आसावरी सराफ, मेघा शिर्के-होमकर, विद्या मणुरे, सुरेखा पाटील , शर्मिला गांधी, विद्या काळे, जिनी सर्व्हिसेसचे चेतन शर्मा आदी उपस्थित होते. 

 स्पर्धा व त्यांचा निकाल असा : 

 निबंध लेखन ः हर्षदा क्षीरसागर (प्रथम), वर्षा मुसळे (व्दितीय), अंकला हरिता (तृतीय). उखाणे स्पर्धा- कमल चव्हाण (प्रथम), सुवर्णा अवधानी(व्दितीय), भाग्यश्री चुंबळकर (तृतीय). रांगोळी - समधा गवई (प्रथम), मोनिका रंगरेज (व्दितीय). कुकींग - अंकिता हरिता (प्रथम), प्रेमा सोमाणी (व्दितीय), संगीता संकलेशा (तृतिय). मेकअप - पूनम शर्मा (प्रथम), आस्मा पुनावाला (व्दितीय). फ्लॉवर डेकोरेशन - संगीता कुलकर्णी (प्रथम), अंकला हरिता (व्दितीय). गायन - तनुश्री म्हंता (प्रथम), तृप्ती 
गायकवाड (व्दितीय). नृत्य - अंकिता देवदारे (प्रथम), प्रियंका भोसले (व्दितीय). होम मिनिस्टर - भाग्यश्री कुलकर्णी (प्रथम), अंकिता हरिता (व्दितीय)