Wed, Apr 24, 2019 16:16होमपेज › Solapur › संतप्त शेतकर्‍यांकडून महावितरणच्या कार्यालयास टाळे (Video)

संतप्त शेतकर्‍यांकडून महावितरणच्या कार्यालयास टाळे (Video)

Published On: Apr 16 2018 7:08PM | Last Updated: Apr 16 2018 7:09PMमाढा वार्ताहर  :

 माढा तालुक्यातील रोपळे खुर्द येथे जळालेला डी. पी. अडीच महिन्यापासून न बदल्‍याने तसेच बुद्रूकवाडी केसरी इथल्‍या डी. पी. वरील लोड कमी करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकर्‍यांनी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी माढा येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयास दुपारी साडेचारच्या सुमारास कुलूप ठोकले. यावेळी कार्यालयात सात जण अडकून पडले.

माढा तालुक्यातील महावितरणच्या कारभाराविषयी शेतकऱ्यांसह नागरिकांत संतापाची लाट आहे. मार्च महिन्यात उपळाई बुद्रुक येथे शेतकर्‍यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना मारहाणही केली होती. त्यांनंतर आज पुन्हा शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला. डी. पी. ची मागणीची पूर्तता न झाल्याने त्यांनी महावितरण च्या कार्यालयला कुलूप ठोकले. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बुद्रूकवाडी येथील केसरी डी. पी. वरील लोड कमी करण्यासाठी शेतकरी विष्णू दळवी यांनी वारंवार यासंदर्भात मागणी करुन ही कार्यवाही झाली नाही. रोपळे खुर्द येथील शिंदे डी. पी. अडीच महिन्यापासून जळाला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी यांना भेटल्यावर या डी. पी. वरील शेतकर्‍यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी एक हजार रूपये भरले तरीही आणखी पैसे भरण्याची मागणी केली जात आहे. महावितरणने शेतकर्‍यांना बोगस बिले दिली आहेत.असा आरोप शेतकर्‍यांनी केला. 

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख, संतोष जगदाळे,गणेश शिंदे, तालुकाध्यक्ष विजय मोरे, युवक अध्यक्ष दिपक भोसकर, विष्णू दळवी, वरूण पाटील, राहुल घोरपडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.