Wed, Mar 27, 2019 00:09होमपेज › Solapur › बाजार समितीतील अपहार; चौकशीसाठी ‘एसआयटी’!

बाजार समितीतील अपहार; चौकशीसाठी ‘एसआयटी’!

Published On: May 25 2018 1:21AM | Last Updated: May 25 2018 1:21AMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून देणार्‍या सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार  समितीतील 39 कोटी  रुपयांच्या अपहारप्रकरणाचा तपास पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्‍तांकडे  दिला  असून या गुन्ह्याच्या तपासासाठी ‘विशेष तपास पथक’ (एसआयटी)ची स्थापना होण्याची शक्यता आहे.

सोलापूर   कृषी   बाजार  समितीमध्ये 1  एप्रिल 2011 ते 17 ऑक्टोबर 2017 या कालावधीत संचालक मंडळ व सचिवांनी संगनमताने 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचा गैरव्यवहार केला म्हणून विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वय 47, रा. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून इंदुमती परमानंद अलगोंडा (रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर),  बाळासाहेब भीमाशंकर शेळके (रा. नांदणी, ता. दक्षिण सोलापूर), महादेव बाबुराव चाकोते (रा. जोडभावी पेठ, सोलापूर), दिलीप ब्रम्हदेव माने (रा. तिर्‍हे, ता. उत्तर सोलापूर), नागराज कल्याणराव पाटील (रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर), शंकर नागनाथ येणगुरे (रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर), ऊर्मिला रावसाहेब शिंदे (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर), अविनाश श्रीधर मार्तंडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर), रजाक शेख अहमद निंबाळे (रा. होनमुर्गी, ता. दक्षिण सोलापूर), धोंडिराम नारायण गायकवाड (रा. बक्षीहिप्परगे, ता. दक्षिण सोलापूर), महादेव आणप्पा पाटील (रा. कुडल, पो. बरूर, ता. दक्षिण सोलापूर), आप्पासाहेब शिवशंकर उंबरजे (रा. रमणशेट्टीनगर, शेळगी, सोलापूर), प्रभाकर गंगाधर विभुते (रा. स्टेट बँक कॉलनी, भवानी पेठ, सोलापूर), दगडू भगवान जाधव (रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर), राजशेखर वीरपाक्षप्पा शिवदारे (रा. इंगळगी, ता. दक्षिण सोलापूर), सदस्य केदार बाबुराव विभुते (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर), राजेंद्र लक्ष्मण गुंड (रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर), प्रवीण विष्णुपंत  देशपांडे (रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर), सिध्दाराम   बाबुराव चाकोते (रा. सरस्वती निवास, जोडभावी पेठ, सोलापूर), सोजर शिवराम पाटील (रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर),  शांताबाई जगन्नाथ होनमुर्गीकर (रा. दर्गनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर), उत्तरेश्‍वर अंबादास भुट्टे (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर),  अशोक  आनंदराव  देवकते  (23 सप्टेंबर 2013 पासून सदस्य)(रा. राजूर, औराद, ता. दक्षिण सोलापूर),  पिरप्पा गुरुसिध्द म्हेत्रे (रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर), श्रीशैल गुलचंद गायकवाड (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर), चंद्रकांत  आमसिध्द खुपसंगे (रा. सादेपूर, निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर), नसीरअहमद महिबुबसाब खलिफा (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर), बसवराज निलप्पा दुलंगे (रा. जोडभावी पेठ, सोलापूर), हकीद महमद शेख (रा. नई जिंदगी चौक, सोलापूर), सिद्रामप्पा गुरुसिध्दप्पा यारगले (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर), सचिव डी.व्ही. कमलापुरे (रा. सोलापूर), सचिव यु. आर. दळवी यांच्याविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्‍त   तांबडे  यांनी    या  गुन्ह्याचा  तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग  करण्याचे  आदेश  दिले असून आता या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्‍तांमार्फत होणार आहे. राजकीयदृष्ट्या हा गुन्हा खूपच संवेदनशील असल्याने या गुन्ह्याच्या तपासासाठी एका स्वतंत्र विशेष पथकाची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच एका विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.