Mon, Jan 21, 2019 19:11होमपेज › Solapur › सोलापूर : दरोडेखोरांचा पोलिसांवर चाकू हल्ला

सोलापूर : दरोडेखोरांचा पोलिसांवर चाकू हल्ला

Published On: Mar 01 2018 8:15PM | Last Updated: Mar 01 2018 8:14PMकरमाळा : प्रतिनिधी

अहमदनगर टेभुर्णी महामार्गावर शेलगाव भाळवणी शिवारात पाच दरोडेखोरांनी ट्रक अडवुन लुटण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी करमाळा पोलिसांनी यातील एका अल्‍पवयीनाला पकडले. याप्रसंगी एका दरोडेखोराने पोलिसांवरच चाकूने हल्‍ला केला यामध्ये एक पोलिस जखमी झाला आहे. 

याबाबत महेश संजय माने या पोलिस कर्मचा-याने करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत करमाळा पोलिसानी एका अल्पवयीन गुन्हेगारास पाठलाग करून पकडले असुन, त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ( एम एच 45/ यु-5922) ही जप्त केली आहे. यावेळी इराणसाहेब आपरिशा भोसले ,धर्मेद्र ऊर्फ गंड्या आपरिशा भोसले ,अभिजित अपरिषा भोसले, येडंग्या ऊर्फ छकुल्या आपरिशा भोसले सर्व रा.शेलगाव वांगी तालुका करमाळा अशी संशयीत आरोपींची नावे असून, हे चौघे यावेळी पळून जाण्यात यशस्‍वी झाले आहेत.

हा प्रकार आज १ मार्च गुरूवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आदिनाथ कारखान्यासमोरील हॉटेल साई समोर झाला आहे.