Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Solapur › नीरा खोऱ्यात पाण्याची प्लस पोजिशन

नीरा खोऱ्यात पाण्याची प्लस पोजिशन

Published On: Jul 08 2018 8:57PM | Last Updated: Jul 08 2018 8:57PMबोंडले - विजयकुमार देशमुख.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या नीरा खोर्‍यातील  नीरा - देवधर, भाटघर व वीर धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणी साठा आहे. त्यातच तिन्ही  धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आठवडा भरापासुन कमी - अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे या पावसामुळे नीरा खोर्‍यातील या तीन धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होऊ लागलेली आहे. २५ जुन रोजी या तीन धरनामध्ये एकुण पाणी साठा २.९३  टीएमसी होत परंतु २५ जुन ते ८ जुलै या १४ दिवसाच्या कालावधीत या तीन धरणाच्या पाणी साठ्यात ७.३१ टीएमसी एवढी वाढ झालेली आहेे.

या धरणाच्या पाण्यावरती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तर  पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर या तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर अवलंबुन आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीकडे या धरणाच्या लाभक्षेत्रामधील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मागील वर्षी आज रोजी नीरा- देवधर, भाटघर व वीर या तीन धरणामध्ये ९.४० टीएमसी एवढा पाणीसाठा होता त्यातुलनेत या वर्षी या तीन धरणाचा एकूण पाणीसाठा १०.२४ टीएमसी म्हणजेच जवळपास ०.८४ टीएमसी एवढा जास्त अाहे. 

रविवार दिनांक ८ जुलै रोजी धरणाची टक्केवारी व कंसात टीएमसी मध्ये पाणीसाठा भाटघर २३.५६ टक्के (५.५३ टीएमसी), निरा - देवधर २३.४४ टक्के (२.७४ टीएमसी), वीर २०.९८ (१.९७ टीएमसी) असा एकूण १०.२४ टीएमसी पाणी साठा झालेला आहे.

तसेच शनिवार स. ६ ते रविवार स.६ या चोवीस तासांत धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पडलेला पाऊस पुढील प्रमाणे कंसात एक जूनपासूनचा आजपर्यंत पडलेला पाऊस  भाटघर २२ मि.मी (१६२ मि.मी), निरा-देवधर ५८ मि.मी (५६९ मि.मी), वीर १३ मि.मी(१८९ मि.मी).