Wed, Apr 24, 2019 12:28होमपेज › Solapur › सोलापूर :  भाटघर, नीरा - देवधर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात  वाढ

सोलापूर :  भाटघर, नीरा - देवधर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात  वाढ

Published On: Jul 13 2018 11:39AM | Last Updated: Jul 13 2018 11:39AM
बोंडले :  विजयकुमार देशमुख

निरा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या निरा खोर्‍यातील भाटघर, निरा - देवधर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली  आहे.  आज सकाळी ६ पर्यंत या तिन्ही धरणांमध्ये एकूण पाणीसाठा १६.६० टीएमसी एवढा झालेला आहे.  एकूण सरासरी टक्केवारी ३६.३९ टक्के एवढी आहे. जर का पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या दोन ते तीन दिवसांत या धरणातील पाणीसाठा ५० टक्यावरती जाईल  असा अंदाज आहे.

मागील वर्षीच्‍या तुलनेत पाणीसाठ्‍यात वाढ :

 मागील वर्षी .१३ जुलै २०१७ रोजी भाटघर ५.८१ टीएमसी,  नीरा - देवधर ३.०४ टीएमसी व वीर धरनात १.५० टीएमसी असा एकुन १०.३५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.  त्या तुलनेत आज रोजी या तीन धरणांमध्ये एकूण पाणीसाठा १६.६० टीएमसी एवढा आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजरोजी ६.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा जास्त आहे.

पालखी सोहळ्यासाठी कालव्यामधुन सोडले पाणी :

  दरम्यान वीर धरणामधून पालखी सोहळ्यासाठी निरा उजवा व डावा कालव्यामधून प्रत्येकी ५०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आलेले आहे.

 भाटघर, निरा - देवधर व वीर या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी सकाळी ६ ते  शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. धरणाचे नाव,  २४ तासातील पाऊस,  एक जूनपासूनचा एकुण पाऊस,  भाटघर ३० मि.मी(२६३ मि.मी),  नीरा देवधर ५८ मि.मी (७६९ मि.मी) व वीर ३ मि.मी (१९९ मि.मी) अशाप्रकारे नोंद झालेली आहे.

शुक्रवार .१३ जुलै २०१८ सकाळी ६ वाजता धरणांची स्थिती पुढिल प्रमाणे :

भाटघर धरण     : 

पाणी पातळी     :   ६०९.२० मी.
एकुण साठा      :   २६५.५१ द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा   :   २५८.४३ द.ल.घ.मी.
टक्केवारी        :   ३८.८३%
उपयुक्त साठा टीएमसी मध्ये :  ९.१३ टीएमसी.

निरा देवधर धरण : 

पाणी पातळी    :    ६४९.३० मी.
एकुण साठा      :   १२७.४४ द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा    :  १२२.१८ द.ल.घ.मी.
टक्केवारी         :  ३६.७९ %
उपयुक्त पाणीसाठा टीएमसी मध्ये :  ४.३१ टीएमसी.

वीर धरण  : 

पाणी पातळी    :   ५७२.२६ मी.
एकुण साठा      :  १०१.५१ द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा    :   ८९.४२ द.ल.घ.मी.
टक्केवारी         :   ३३.५७%
उपयुक्त पाणीसाठा टीएमसी मध्ये  : ३.१६ टीएमसी.