Sun, Feb 17, 2019 07:08होमपेज › Solapur › शहर-जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी

शहर-जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी

Published On: Aug 26 2018 10:29PM | Last Updated: Aug 26 2018 10:03PMसोलापूर : प्रतिनिधी   

सोलापूर शहर व जिल्ह्यात रविवारी दुपारी दमदार पाऊस झाला. अद्यापही अनेक भागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरी आणि बोअरमधील पाण्याची पातळी आद्यापही जैसे थेच आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठ्या पावसाची गरज कायम आहे. शहरात सायंकाळी 5.30 पर्यंत 15.1 मि. मि. पावसाची नोंद हवामान खात्यामध्ये झाली आहे.

रविवारी दुपारी तीननंतर उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी आणि सोलापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोलापूर शहरातील अनेक भागात हा पाऊस पडला होता. त्यामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले होते. तर रक्षाबंधनाच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी समाधानकारक वातावरण होते. सध्या खरिपाला या पावसाचा अधिक लाभ होणार आहे. दुपारी तीननंतर जिल्ह्यातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता तर ढगाळ वातावरण कायम होते. तसेच काही वेळा अधून मधून हलक्या स्वरुपाचा पाऊस येत होता. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ झाली होती.