Sun, Aug 25, 2019 19:02होमपेज › Solapur › सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघात ; कर्नाटकातील एक ठार 

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघात ; कर्नाटकातील एक ठार 

Published On: Feb 07 2018 7:13PM | Last Updated: Feb 07 2018 7:13PMउमरगा : प्रतिनिधी

सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर तलमोड जवळ नविन टोलनाक्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बुधवार, दि. ६ रोजी सायंकाळी पाच वाजता ट्रक व कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील एकजण ठार तर पाच वर्षांच्या बालकासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. 

कर्नाटक राज्यातील हणमंतवाडी (ता. बसवकल्याण) येथे गाव कार्यक्रम आटोपून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या कार (क्र. एमएच १३ एसी ३३५५) ला सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ट्रक ( क्र. एपी २६ वाय ३५६७) ने तलमोडजवळ समोरून येणार्‍या कारला जोरात धडक दिली. या धडकेत कारमधील चंद्रशेखर श्रीमंत रेड्डी (वय ५०, रा. आळंद, कर्नाटक) हे जागीच ठार झाले. सुहासिनी सचिन गादा (वय ३०), कौशीक सचिन गादा (वय ५ वर्षे), संजय गादा (वय ५०), अंजली गादा( वय ४५, सर्वजण रा. सोलापूर) हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक स्वतः हून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.