होमपेज › Solapur › गुरुपौर्णिमेनिमित्त बाळे येथील श्रीकृष्णाश्रमात आज कार्यक्रम

गुरुपौर्णिमेनिमित्त बाळे येथील श्रीकृष्णाश्रमात आज कार्यक्रम

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:47PMसोलापूर : प्रतिनिधी

बाळे येथील श्रीकृष्णाश्रमात शुक्रवार, 27 जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुुरु आण्णा महाराज पवार यांच्या समाधीचे दर्शन घेवून त्यांचे शिष्य नामजप करतात. श्रीकृष्णाश्रमात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते.  महाप्रसादाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडतो. मुंबई, पुणे, सातारा, नगर, बेळगाव आदी विविध शहरातून दरवर्षी शिष्य मोठ्या प्रमाणात श्रीकृष्णाश्रमात एकत्र येतात.  

शहरातील विविध ठिकाणच्या श्री दत्त मंदिरात आणि मठांमधूनही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच शहर व जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमधूनही गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गुरुंना आदराने वंदन करुन मोठ्या उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.