Mon, May 27, 2019 10:00होमपेज › Solapur › आजपासून रणधुमाळी

आजपासून रणधुमाळी

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:46PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जानेवारी-फेबु्रवारी 2018 मध्ये मुदत संपणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी मंगळवार, दि. 5 पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असून, अर्ज दाखल करण्याची मुदत ही 11 डिसेंबरपर्यंत आहे.

जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यामध्ये पंढरपूर तालुक्यातील  1, माढा 12, माळशिरस 4, मंगळवेढा 19, दक्षिण सोलापूर 6, अक्‍कलकोट 3, बार्शी 32, सांगोला 3, करमाळा 13 आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या सर्व ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत ही 11 डिसेंबरपर्यंत असून, उमेदवारी अर्जांची छाननी 12 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 14 डिसेंबर असून, त्याच दिवशी  दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. 26 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे व दि. 27 रोजी मतमोजणी होणार आहे. या 64 ग्रामपंचायतींमध्ये टेंभुर्णी, जेऊर, माळीनगर आदी मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.