Mon, Jun 17, 2019 10:44होमपेज › Solapur › ग्रामपंचायत निवडणुकीकरिता जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज

Published On: Dec 22 2017 1:30AM | Last Updated: Dec 21 2017 8:46PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मंगळवार, 26 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून मतदानासाठी 253 मतदान केंद्रे तसेच 3  हजार  अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील माळीनगर टेंभुर्णी या मोठ्या ग्रामपंचायतीसह 64 ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या 64 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने 253 केंद्रांची व्यवस्था केली आहे. 63 निवडणूक निर्णय अधिकारी, 28 क्षेत्रीय अधिकारी, 284 मतदान केंद्राध्यक्ष, 284 मतदान अधिकारी, 262 शिपाई, 1 हजार 183 इतर अधिकारी व कर्मचारी, तर सुरक्षेसाठी 299 पोलिस कर्मचारी अशा एकूण 3 हजार 4  कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  64 ग्रामपंचायतींच्या  253 मतदान केंद्रांवर मतदानासाठी  278 कंट्रोल युनिट, 557 बॅलेट युनिट, तर 278 मेमरी चीप  इत्यादी मतदान साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी 55 वाहनांची व्यवस्था 

मतदाना दिवशी कर्मचार्‍यांना साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचविणे व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत सर्व मतदान साहित्यासह तालुक्याच्या ठिकाणी आणण्यासाठी एकूण 55 वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये 28 जीप व 27 एस.टी. बसेसचा समावेश आहे.

1 लाख 55 हजार मतदार

9 तालुक्यांतील 64 ग्रामपंचायतींसाठी एकूण 1 लाख 55 हजार 887 मतदार मतदान करणार असून यामध्ये 82 हजार 616 पुरूष, तर 73 हजार 171 स्त्री मतदारांचा समावेश आहे

मतदानासाठी स्थानिक सुट्टी 

64 ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. सर्वांना मतदान करता यावे म्हूणन  निवडणूक असणार्‍या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात  स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 26 ला मतदान, तर 27 तारखेला मतमोजणी होणार आहे.