Mon, Apr 22, 2019 12:28होमपेज › Solapur › सिव्हिलमधील सुविधांसाठी माजी विद्यार्थी सरसावले

सिव्हिलमधील सुविधांसाठी माजी विद्यार्थी सरसावले

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 10:45PMसोलापूर : प्रतिनिधी

 डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मेडिकल कॉलेज आणि सिव्हिलच्या विकासासाठी सरसावले आहेत. तसा निर्धार त्यांनी नुकताच जुन्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या स्नेहसंमेलनात केला आहे.

मेडिकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटना, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाच्यावतीने 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन झाले. यामध्ये 1963 ते 2018 पर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक, माजी डीन आदींचा समावेश होता. यामध्ये 1 एप्रिल रोजी माजी विद्यार्थ्यांनी चर्चा करून मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे वस्तू आणि सेवांच्या माध्यमातून कायम मदत करण्याचे आश्‍वासन दिले. 

मागील 21 वर्षांनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा मळावा घेण्यात आला. आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येथे सोयीसुविधा देण्यासाठी चर्चा झाली आणि अनेक माजी विद्यार्थी मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. काही विद्यार्थी वैयक्तिकरित्या मदत करणार असून काही विद्यार्थी हे त्यांच्या बॅचच्या माध्यमातून मदत करणार आहेत. ही मदत फक्त आर्थिकच नव्हे तर रुग्णालयासाठी उपकरणे देणे, रुग्णांची सेवा करणे, अशी असणार आहे. यातून माजी विद्यार्थ्यांची आपल्या महाविद्यालयासाठी आणि सिव्हिलसाठी आपुलकी असल्याचे दिसून येत आहे.