होमपेज › Solapur › तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेऊन, तिचे फोटो काढून, जवळीक साधून तिचा विनयभंग करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या मुलाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकी  ऊर्फ विक्रांत धोंडिराम राठोड (रा. कवितानगर पोलिस वसाहत) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. यातील पीडित तरुणी ही कॉलेजला शिकत असून विकी राठोड याने तिच्याशी ओळख करून ती वाढवून तिला लग्न करतो असे सांगितले. त्यानंतर राठोड यानेतरुणीला विजापूर रोडवरील प्राणीसंग्रहालय, होटगी येथील साईबाबा मंदिर, हुतात्मा स्मृती मंदिर येथे फिरायला घेऊन जाऊन तिच्याशी जवळीकता करून त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले. 

नंतर सुमारे 3 महिन्यांपासून तरुणी व विकी राठोड हे बोलले नाहीत. दरम्यानच्या काळात तरुणीची परीक्षा असताना ती पेपर देऊन घरी जात असताना वाटेत  राठोड याने तिचा पाठलाग करून तिच्याशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने दाद न दिल्यााने राठोड याने त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो एका दुसर्‍या मुलीच्या फेसबुक अकौंटवरून पाठवून त्यातरुणीची बदनामी केली म्हणून याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात विनयभंग, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा  आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बहिरट तपास करीत आहेत.


  •