Tue, Jul 16, 2019 02:01होमपेज › Solapur › वीटभट्टीवर काम करणार्‍या महिलेवर सामूहिक बलात्कार

वीटभट्टीवर काम करणार्‍या महिलेवर सामूहिक बलात्कार

Published On: Feb 27 2018 8:20AM | Last Updated: Feb 26 2018 10:16PMसोलापूर : प्रतिनिधी

वीटभट्टी मालकाच्या दुचाकीवरून घराकडे जाणार्‍या कामगार महिलेेवर  बलात्कार केला. तसेच   वीटभट्टी मालकाला जबर मारहाण करून त्यांच्याकडील 4500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पीडित महिला ही वीटभट्टीवर  काम  करणार्‍या कामगाराची पत्नी  असून तीसुद्धा येथे मजुरी करते. पतीबरोबर भांडण झाल्याने ती रविवारी रात्री तिच्या मुलीकडे निघाली होती. त्यावेळी वीटभट्टीचा मालक हा दुचाकीवरून पीडित महिलेकडे गेला व तिची समजूत काढून तिला दुचाकीवर बसवून तिच्या घराकडे सोडण्यास जात होता. त्यावेळी समाधाननगरजवळील निर्जन रस्त्यावरून जात असताना रस्त्यात तीन अनोळखी व्यक्ती त्यांची मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून रस्त्यामध्येच उभारले होते. त्यांना वीटभट्टीच्या मालकाने रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले असता त्या तिघांनी
 रस्ता अडवून वीटभट्टीमालकास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे  दुचाकीवरून वीटभट्टीमालक व  पीडित महिला हे दोघेही खाली पडले. त्यावेळी तिघांपैकी एकाने पीडित महिलेला बळजबरीने ओढत काही अंतरावर नेले व तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. इतर दोघांनी वीटभट्टीमालकाला मारहाण करून झाल्यानंतर येऊन पीडित महिलेवर जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी पीडित महिलेने जोरदार आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यावर तिघांनीही त्यांची दुचाकी क्र. एमएच 13 सीर्ई 0885 ही तिथेच सोडून पळ काढला. पळून जाताना तिघांनीही पीडित महिलेचा मोबाईल, तिच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र व रोख 4500 रुपये असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही बाब एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबत गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक वाबळे तपास करीत आहेत.