होमपेज › Solapur › कंदलगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा; 6 जणांना अटक, 10 पसार

कंदलगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा; 6 जणांना अटक, 10 पसार

Published On: May 03 2018 10:50PM | Last Updated: May 03 2018 10:43PMसोलापूर : प्रतिनिधी

कंदलगाव येथील देशमाने यांच्या शेतातील जुगार अड्ड्यावर सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 6 जणांना अटक केली, तर 10 जण पळून गेले. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल हँडसेट, 14 मोटारसायकल, रोख रक्‍कम असा 3 लाख 33 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई  बुधवारी रात्री करण्यात आली.

सिद्रामप्पा  मारुती डफळे (वय 34, रा. कंदलगाव), मल्लिनाथ सिद्राम नागमोते (48, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर), काकासाहेब दिगंबर चव्हाण (32, रा. विंचूर), सिद्धू भीमराव व्हनमाने (40, रा. कंदलगाव), सूर्यकांत म्हाळप्पा लोणारी (50, रा. विंचूर), सुधाकर हणमंत कोरे ( 45, रा. उंब्रज, ता. इंडी, जि. विजापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर मंजू कळसकर, बापू विजापुरे (रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर), संजय सबजे, पंडित बनसोडे, दौला कासिम शेख, सादूल राऊतराव (रा. कंदलगाव), सैपन सवाळे (रा. उंब्रज, ता. इंडी, जि. विजापूर), महिबूब राजाभाई मुल्ला (रा. भंडारकवठे), बजाज दुचाकी नं. एमएच 13 बीएस 5583 चा मालक, हीरो होंडा दुचाकी (क्र. एमएच 13 सीव्ही 0376) चा मालक हे पळून गेले आहेत. याबाबत पोलिस हवालदार मारुती रणदिवे यांच्या फिर्यादीवरून मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंदलगाव येथील देशमाने यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली मन्ना नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देशमाने याच्या शेतातील जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यावेळी पोलिसांना पाहून अनेक जुगारी हे त्यांच्या दुचाकीवरुन पळून गेले, तर पोलिसांनी 6 जुगार्‍यांना जागेवरच ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्‍कम, मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य असा 3 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, हवालदार मारुती रणदिवे, संदीप काशिद, विजयकुमार भरले, दिलीप राऊत, संभाजी खरटमल, पोलिस नाईक सुभाष शेंडगे, नागनाथ चमके, पोलिस शिपाई सचिन गायकवाड, दीपक जाधव यांनी केली.