Tue, May 21, 2019 22:22होमपेज › Solapur › 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त

2 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 11:31PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यांच्या यात्रेसाठी (गड्डा यात्रा) दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एसआरपीसह बाहेरील 500 पोलिस बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत.  नंदीध्वज   मार्गावर चार, तर संमती कट्टा  आणि  होम मैदान  येथेही वॉच टॉवर  उभारण्यात आले आहेत. पाकिटमारांना पकडण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. याशिवाय बाराबंदी वेशात बारा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

गड्डा यात्रेसाठी  पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त, 15 पोलिस निरीक्षक, 44 फौजदार, 755 पुरूष कर्मचारी, 87 महिला कर्मचारी, 500 होमगार्ड,  दोन राज्य राखीव बलाचे कंपनी, पाच स्टॅगिंक फोर्स  तैनात आहे, बाहेरून एक सहायक पोलिस आयुक्त, 10 पोलिस निरीक्षक, 25 फौजदार, 350  पोलिस कर्मचारी येणार आहेत. 

नंदीध्वज मिरवणूक मार्गावर वॉच टॉवर उभे करण्यात आले आहेत. त्याठिकाणाहून दुर्बिणीद्धारे टेहाळणी करण्यात येणार आहे. अक्षता सोहळ्यावेळी संमती कट्ट्यावर चार टॉवर, तर होम मैदानावर चार टॉवर उभारण्यात आले आहेत. 

गर्दीच्यावेळी मंगळसूत्र चोर्‍या रोखण्यासाठी एक फौजदार, चार कर्मचारी यांची दोन पथके तैनात करण्यात येणार आहेत. पाकिटमारांना पकडण्यासाठी   गुन्हे  शाखेचे विशेष पथक  असणार आहेे. बाराबंदीमध्ये विशेष शाखेचे आठ कर्मचारी, तर गुन्हे शाखेचे चार पोलिस असे बाराजण तैनात असणार आहेत.  अक्षता सोहळ्या दिवशी संमती कट्टा परिसरात महिलांची जास्त गर्दी असल्याने 23 महिला पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. याशिवाय पोलिस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नंदीध्वज मार्ग,  होमकट्टा,  दारूकामाच्या  गर्दीच्या ठिकाणी  साध्या  वेशात  पोलिस कर्मचारी  फिरणार आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याला देण्यात आलेल्या कॅमेराद्वारे संशयितांचे फोटो काढण्यात येत आहेत.  सिद्धेश्‍वर मंदिर व होम मैदान याठिकाणी सीसीटीव्ही लावून त्यातून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.