होमपेज › Solapur › आंतरराज्यातील मालवाहतुकीस ई-वे बिल प्रणाली अनिवार्य

आंतरराज्यातील मालवाहतुकीस ई-वे बिल प्रणाली अनिवार्य

Published On: Jan 28 2018 10:16PM | Last Updated: Jan 28 2018 9:05PMसोलापूर : प्रतिनिधी   

 महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 अंतर्गत ई-वे बिल प्रणाली महाराष्ट्र राज्यात लागू होत असल्याने 1 फेब्रुवारी 2018 पासून आंतरराज्यीय मालाची वाहतूक करण्यासाठी ई-वे बिल प्रणाली अनिवार्य असल्याची माहिती सोलापूर विभागाचे राज्यकर सहआयुक्‍त यु.ए. बिराजदार यांनी दिली.

ई-वे-बिल प्रणालीची नोंदणी प्रक्रिया 16 जानेवारी 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. व्यापारी, मालवाहतूक करार हे 16 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत या प्रणालीमध्ये नोंदणी करू शकतात. तसेच प्रायोगिक तत्वावर ई-वे-बिल निर्माण करू शकतात. प्रायोगिक तत्वावर निर्माण केलेल्या ई-वे-बिलांचा वस्तू व सेवा कर कार्यालयाकडून कोणत्याही कारणासाठी वापर करण्यात येणार नाही. त्यामुळे प्रणालीमध्ये नोंदणी करून ई-वे-बिल निर्माण करण्याचा सराव करावा. नोंदणी कालावधीत नोंदणी झालेल्या व्यापार्‍यांना 1/2/2018 पासून पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
ई-वे-बिल संदर्भात शंका व समस्या असल्यास स्थानिक मदत कक्ष किंवा 1800225900 या टोल फ्री क्रमांकावर तसेच ुुु.ारहरसीीं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही  बिराजदार यांनी केले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे प्रशासकीय कामातही पारदर्शकता येण्यास मदत मिळणार आहे. पुढील काही दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर काही बदल जाणवतील.