Mon, Aug 19, 2019 09:15होमपेज › Solapur › त्रिसूत्रीतूनच यशाची प्राप्ती : न्या. बिराजदार

त्रिसूत्रीतूनच यशाची प्राप्ती : न्या. बिराजदार

Published On: Feb 27 2018 8:21AM | Last Updated: Feb 26 2018 8:54PMसोलापूर : प्रतिनिधी 

जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी आपले ध्येय निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी वाटचाल सुरू केली पाहिजे. ही वाटचाल करत असताना जिद्द, प्रामाणिक प्रयत्न व प्रचंड आत्मविश्‍वास असला पाहिजे. हिच यशाची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन नूतन न्यायाधीश सुप्रिया बिराजदार यांनी केले.

 वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील वीरशैव समाजातील पहिल्या महिला न्यायाधीशपदी निवड झालेल्या सुप्रिया बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी  मंचावर वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा श्‍वेता हुल्ले, उपाध्यक्षा पौर्णिमा पाटील, कार्याध्यक्षा वर्षा काशेट्टी, पूजा निलंगे, ज्योत्स्ना पाटील, मीनाक्षी बिराजदार उपस्थित होते.   महाराष्ट्र नागरी सेवा आयोगाच्या न्यायाधीशपदाच्या परीक्षेत सुप्रिया बिराजदार यांनी हे यश संपादन केले. त्यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. एल.एल.एम. झालेले आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सिद्धेश्‍वर प्रशालेत, तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद व फर्ग्युसन पुणे येथे झाले आहे.

श्‍वेता हुल्ले यांनीही  बिराजदार यांनी ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन केले. यावेळी आशा पाटील, श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, राजश्री गोटे, सोनल शेटे, माधुरी बिराजदार, अमृता नकाते, ज्योती शेटे, पुदे,  शिवानी धबडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजशेखर बुरकुले, आनंद दुलंगे, शिवानंद सावळगी, विजय बिराजदार, काशिनाथ बिराजदार, दुंडप्पा कुर्ले, बसवराज गुरगुरे, लक्ष्मण कोरे यांनी परिश्रम घेतले.