Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Solapur › शहरात क्रिकेटवरून राडा

शहरात क्रिकेटवरून राडा

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:16PMसोलापूर : प्रतिनिधी

क्रिकेटच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीचे पर्यवसन दगडफेकीमध्ये होऊन अनेक वाहनांचे नुकसान झाले. ही दगडफेकीची घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बापूजी नगरात घडली. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहीद सईद शेख (वय 18) याच्या फिर्यादीवरून नरसप्पा सानेपागूल, गोवर्धन नरसप्पा सानेपागूल, विजय नामदेव गुगलेरा (सर्व रा. बापूजी नगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्ह्यात गोवर्धन नरसप्पा सानेपागूल (वय 22) याच्या फिर्यादीवरून वाहीद शेख, जाकीर शेख, जावेद शेख  यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसर्‍या गुन्ह्यात वाहीद सईद शेख (वय 28) याच्या फिर्यादीवरून श्रीनिवास भंडारे, जिज्जा भंडारे, अज्या सोगाळे, शाम मुळे, आनंद मेन्सीनोलू, सुनील, चिकल्या, रवी गोणे, महेश, मोहन, चिन्ना व इतर 7 ते 8 जण (सर्व रा. बापूजी नगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी एकच्या सुमारास वाहीद शेख व त्याचा भाऊ जाकिर हे घरासमोर फॅब्रिकेशनचे काम करत असताना ज्ञानसागर शाळेच्या मोकळ्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेटचा बॉल वारंवार शेख याच्या घरी येत होता. त्यावेळी मुलांना समजावून सांगत असताना त्या मुलांचे नातेवाईकांनी शेख याच्या घरातील लोकांना अर्वाच्च शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी वाहीद शेख याच्या खिशातील रोख 7500 रुपये कोठेतरी पडून गहाळ झाले. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोवर्धन सानेपागूल याच्या फिर्यादीनुसार ज्ञानसागर शाळेच्या मैदानात लहान मुले क्रिकेट खेळताना एका मुलास जाकीर शेख याने इथे क्रिकेट खेळू नका म्हणून चापट मारली. त्यावेळी विचारणा करण्यास गेल्यानंतर वाहीद शेख व इतरांनी सानेपागूल यास मारहाण करून शिवीगाळ केली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा 
दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस नाईक अत्तार तपास करीत आहेत. तर वाहीद शेख हा बुधवारी रात्री घरी असताना श्रीनिवास भंडारे व इतरांनी दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शेख व इतरांना अश्‍लिल शिवीगाळ करून दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये शेख याच्या घराजवळील एमएच 13 एएच 9459 क्रमांकाची दुचाकी, एमएच 14 एएम 7102 क्रमांकाची कार, एमएच 13 एझेड 4095 क्रमाकांची दुचाकी, एमएच 02 केए 6831 क्रमाकांची इंडिका कार, एमएच 13 बी 4323 आणि एमएच 13 बीटी 1555 क्रमाकांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पठाण तपास करीत आहेत.