Sun, Mar 24, 2019 06:41होमपेज › Solapur › बोधचिन्ह मिळालेल्या पोलिसांचा सत्कार

बोधचिन्ह मिळालेल्या पोलिसांचा सत्कार

Published On: May 03 2018 10:50PM | Last Updated: May 03 2018 10:37PMसोलापूर : प्रतिनिधी

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक पदकप्राप्त 26 पोलिस कर्मचार्‍यांचा मंगळवारी पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उल्लेखनीय सेवेबद्दल शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस महासंचालक पदकप्राप्त 26 जणांना महाराष्ट्र दिनी पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री विजयकुमार देशमुख व पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते महासंचालक बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी आयुक्तालयातर्फे त्या कर्मचार्‍यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात 
आला. 

यावेळी विमल तांबडे, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गिते उपस्थित होते. सहाय्यक फौजदार सतीश धामणसकर, नागय्या स्वामी, अंबादास राठोड, प्रदीप कुलकर्णी, महादेव सावंत, पोलिस हवालदार झाकिरहुसेन शेख, जयंत चवरे, माधव धायगुडे, जयकुमार चव्हाण, शांताराम वाघमारे, संजय पवार, तानाजी दोडकुले, राजकुमार तोळनुरे, सीमा डोंगरीतोट, पोलिस नाईक आप्पासाहेब पवार, मोहन गवळी, पोलिस हवालदार जहागिरदार, सतीश भोईटे, राजू ओहोळ, विश्‍वास भिटे, अनिल जाधव, नागनाथ  फुटाणे, पोलिस नाईक संतोष कुलकर्णी व रविंद्र परबत यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले.