Thu, Nov 15, 2018 09:33होमपेज › Solapur › गेम खेळताना मोबाईल काढून घेतला; तरुणाने सोडले घर

मोबाईल काढून घेतला; तरुणाने सोडले घर

Published On: Sep 04 2018 7:28PM | Last Updated: Sep 04 2018 7:28PMसोलापूर : प्रतिनिधी 

मोबाईल फोन हा तरुणांसाठी किती सवयीचा बनला आहे आणि त्याच्या व्यसनाने तरुणाईला कसं व्यापून टाकलं आहे, याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतील एका घटनेने येत आहे. मोबाईल फोनवर गेम खेळत असताना वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने मुलाने घर सोडल्याची घटना बार्शीतील वाणी प्लॉट इथे घडली. प्रतीक शिवराज खराडे (वय 19)  वर्षे असे या तरुणाचं नाव असून, तो चार दिवसांपासून गायब आहे.

याबाबत वडील शिवराज खराडे यांनी बार्शी पोलिसात तक्ररा दाखल केली आहे. 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रतीक घरात मोबाईलवर गेम खेळत होता. खामकरवाडी येथे शिक्षक असलेले त्याचे वडील कामावरुन परत आले. मुलगा फोनवर गेम खेळत असल्याचं पाहून ते मुलावर रागावले आणि मोबाईल काढून घेतला.

या प्रकारानंतर मुलगा उठला आण घराबाहेर पडला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. तासाभराने तो सापडलाही.  परंतु घरी नेत असताना त्याने हिसका देऊन पळ काढला. तेव्हापासून आजवर त्याचा पत्ता नाही. तो नातेवाईकांकडेही गेला नाही आणि मित्रांकडेही नाही. कुठेही त्याचा शोध लागत नसल्याने वडील शिवराज खराडे यांनी बार्शी पोलिसात तक्रार दिली. आता पोलिस आणि नातेवाईक प्रतीकचा शोध घेत आहेत.

अस्वस्थ झालेल्या खराडे कुटुंबाने नागरिकांनाही  मदतीचे आवाहन केलं आहे. हा मुलगा  रंगाने गोरा असून, उंची सुमारे 164 सेंमी, अंगाने सडपातळ, केस काळे, नाक सरळ, चेहरा गोल, अंगात राखाडी रंगाचा टी शर्ट, काळसर जीन्स, हिंदी मराठी भाषा बोलतो, असं त्याचं वर्णन आहे. हा मुलगा कोणाला आढळल्यास शिवराज खराडे 9403394102, सहाय्यक पोलिस फौजदार महारुद्र मुंढे 9323331899, 02184223333 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले आहे.