होमपेज › Solapur › लग्नासाठी मुलगी दे म्हणून मामाला मारहाण

लग्नासाठी मुलगी दे म्हणून मामाला मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

लग्नासाठी मुलगी दे म्हणून बहिणेने भावाच्या कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना अक्कलकोट रोडवरील सुनील नगर येथे घडली आहे.कोमल दत्तात्रय पगडीयाल (वय 22), भाग्यरेखा दत्तात्रय पगडीयाल ( 53), दत्तात्रय पगडीयाल ( 55 तिघे राहणार न्यू सुनीलनगर अक्कलकोट रोड, एमआयडीसी) यांना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास लग्नासाठी माझ्या मुलाला तुझी मुलगी दे म्हणून बहीण नर्मदा, अर्चना, नरेश, रामलू यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

या मारहाणीमध्ये जखमी झाले आहेत, अशी फिर्याद सिव्हिल पोलिस चौकीत देण्यात आली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.