Tue, Sep 25, 2018 14:42



होमपेज › Solapur › महिलेवर अत्याचार; दिलीप मानेंवर गुन्‍हा

महिलेवर अत्याचार; दिलीप मानेंवर गुन्‍हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

वेबसाईटवरून   मैत्री   करून, खोटे लग्‍न करून, तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी आमदार तथा विधान परिषदेचे काँग्रेसचे विद्यमान उमेदवार दिलीप मानेंसह पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिलीप ब्रह्मदेव माने (वय 52, रा. महिला  हॉस्पिटलजवळ, सोलापूर),  निखिल नेताजी भोसले (30), त्याची पत्नी तृप्ती निखिल भोसले (30), आई वेदमती नेताजी भोसले (48, सर्व रा. महिला हॉस्पिटलजवळ, सोलापूर), धनंजय भोसले (45,  रा. डी-मार्टजवळ, जुळे सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली आहे.

यातील पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित तरुणीशी निखिल भोसले याने विवाहविषयक  वेबसाईटवरून मे 2016 मध्ये ओळख केली व मैत्री वाढविली. त्यानंतर निखिल भोसले याने त्या तरुणीशी तुळजापूर येथे लग्‍न केले. त्यानंतर निखिलने त्या तरुणीशी तुळजापूर व सोलापूर-पुणे महामार्गावरील एका ठिकाणी शरीरसंबंध ठेवले व त्या तरुणीचे नग्‍न फोटो काढले. निखिलची पत्नी तृप्ती व आई वेदमती यांनी निखिलने काढलेले फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याचीधमकी देऊन   तिला ब्लॅकमेल करून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्यामुळे पीडित तरुणीने घाबरून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तृप्ती भोसले हिने त्या तरुणीचे  फोटो सोशल मीडियावर पाठवण्याची धमकी दिली व 2 कोटी रुपयांची मागणी केली.  निखिल व तृप्ती या दोघांनी पीडितेचे 6 तोळ्याचे मंगळसूत्र घेतले. तृप्तीने पीडित तरुणीचा व निखिलचा विवस्त्र फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. त्यानंतर सर्वांनी मिळून पीडित तरुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला ठार मारण्याची धमकी दिली म्हणून पीडितेने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.

न्यायालयाने त्या फिर्यादीची खातरजमा केल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करून घेण्याबाबत पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत.

उमेदवारी मिळताच बदनामी करण्याचे षड्‍यंत्र : माने
महिलेवरील अत्याचाराच्‍या आरोपाचा दिलीप माने यांनी साफ इन्‍कार केला आहे. मी त्या मुलीला ओळखतच नाही. मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच हे बदनाम करण्याचे षड्‍यंत्र आहे. मी तिच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे या प्रकरणावर बोलताना दिलीप माने यांनी सांगितले.