Sun, Apr 21, 2019 02:19होमपेज › Solapur › राष्ट्रवादीला भाजपबरोबर संसार थाटायचा आहे : रामदास कदम

राष्ट्रवादीला भाजपबरोबर संसार थाटायचा आहे : रामदास कदम

Published On: Feb 04 2018 6:09PM | Last Updated: Feb 04 2018 6:09PMसोलापूर : प्रतिनिधी

सध्या राष्ट्रवादीला सत्तेत सामील व्हायचे आहे. त्यामुळे भाजप सेनेची युती कधी तुटतेय, यासाठी राष्ट्रवादीचे नेते वाटच पाहत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोलापूर दौर्‍यावर केला आहे.

कदम हे तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रविवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. तसेच त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, साईनाथ अभंगराव, प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, भाऊसाहेब आंधळकर आदी उपस्थित होते. 

यावेळी येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी बूथनिहाय संघटनेची बांधणी करण्यात येणार असून, त्यासाठी मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येणार असल्याचेही कदम यावेळी म्हणाले.