Tue, Nov 13, 2018 05:58



होमपेज › Solapur › साखरपुड्यानंतर लग्नास नकार; तीन पोलिसांसह पाच जणांवर गुन्हा

साखरपुड्यानंतर लग्नास नकार; तीन पोलिसांसह पाच जणांवर गुन्हा

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 10:01PM

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

साखरपुडा केल्यानंतर हुंडा दिला तरच लग्न करतो, नाही तर लग्न करणार नाही, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी, तसेच हुंडाप्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस दलातील तीन कर्मचार्‍यांसह पाच जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसशिपाई सचिन राजस्थान पवार (नेमणूक- आरसीपी क्र. 1, सोलापूर शहर पोलिस), पोलिस हवालदार राजस्थान पवार (नेमणूक-ग्रामीण पोलिस मुख्यालय), महिला पोलिसशिपाई प्रिया राजस्थान पवार (नेमणूक- ग्रामीण पोलिस मुख्यालय), नंदाबाई राजस्थान पवार, नितीन राजस्थान पवार (रा. केशवनगर पोलिस लाईन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मंगल रामजी काळे (रा. सेटलमेंट कॉलनी नं. 1, पारधी कॅम्प) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

मंगल काळे हिची मुलगी प्रियंका रामदास काळे (वय 19) हिचा पोलिस शिपाईसचिन पवार याच्याशी 21 ऑगस्ट 2016 रोजी रीतसर मानपान देऊन साखरपुडा झाला आहे. त्यानंतर पोलिसशिपाई सचिन पवार, त्याचे वडील पोलिस हवालदार, महिला पोलिसशिपाई प्रिया पवार, नंदाबाई पवार, नितीन पवार यांनी लग्नासाठी एक लाख रुपये हुंडा आणि एक प्लॉट घेऊन दिला तरच लग्न करतो, अशी अट घातली. मंगल काळे यांनी पवार यांची भेट घेऊन अनेकदा चर्चा केली होती.