होमपेज › Solapur › सोलापुरात २ पासून ‘इलेक्ट्रो-२०१८’

सोलापुरात २ पासून ‘इलेक्ट्रो-२०१८’

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:35PMसोलापूर  प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेस अशा विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन म्हणजे ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शन आणि याच प्रदर्शनाची सुरुवात येत्या 2 ते 7 फेबु्रवारीदरम्यान होणार असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष खुशाल देढिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनतर्फे दरवर्षी इलेक्ट्रोचे प्रदर्शन भरवले जाते. यंदा 19 वे ‘इलेक्ट्रा-2018’ हे प्रदर्शन हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. याचे उद्घाटन एचडीबी फायनान्सियल सिर्व्हिस लि.चे नॅशनल हेड आकाश बारबारिया आणि सॅमसंगचे गोविंद उत्तम चंदानी यांच्या हस्ते  शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होईल.

हे प्रदर्शन दररोज दुपारी 4 ते रात्री साडेनऊ, तर रविवारी सकाळी 11 ते रात्री साडेनऊ यावेळेत भरणार आहे.

याचे मुख्य प्रायोजक सॅमसंग मोबाईल आहे. 6 दिवस चालणार्‍या प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे.  ज्यामध्ये तीनशेपर्यंत स्टॉल आहेत. यातील विविध वस्तू कमी दरात ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत तसेच बजाज एचडीबी व एचडीएफसी फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे.  
या प्रदर्शनात ग्राहकांना ठिकठिकाणी बसण्याची, शुध्द पाण्याची सोय केली आहे. दररोज लकी ड्रॉ  व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉव्दारे विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. 
यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. सेडाच्या सभासदांच्या कर्मचार्‍यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येणार आहे. 4 स्टॉल्स सामाजिक संस्थांना उपलब्ध करून दिले आहेत. येथे विविध प्रकारचे कारंजे, संपूर्ण मैदानावर मॅट, फूड कोर्ट, धबधबे आदींची व्यवस्था केली आहे.  या पत्रकार परिषदेस अध्यक्ष जितेंद्र राठी, उपाध्यक्ष ईश्‍वर मालू, आनंद येमूल, भूषण भुतडा, सुयोग कालाणी, विजय गोसकी, केतन शहा, आनंदराज दोशी, दीपक मुनोत उपस्थित होते.

आयडल्स सामाजिक संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात सोलापूर : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून आयडल्स सामाजिक संस्थेतर्फे सम्राट चौक येथील रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. संस्थापक कुणाल बाबरे व शाब्दी सोशल ग्रुपचे संस्थापक रसूल पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी रसूल पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्‍त  केले.