Thu, Apr 18, 2019 16:08होमपेज › Solapur › डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांचे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांचे अभिवादन

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:06PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त एम.बी. तांबडे, महापौर शोभा बनशेट्टी, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी हजेरी लावली. सकाळपासून पार्क चौक येथे महिला-पुरुष, युवक व युवती मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर चौकात पुस्तकांचे स्टॉल, निळ्या झेंड्याचे स्टॉल लावण्यात आले होते तसेच रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पार्क चौकात हजारो भीमसैैनिकांचा जनसागर लोटला होता. पार्क चौक ते सरस्वती चौक हा रस्ता वाहनांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. बसपाच्या वतीने अ‍ॅड. संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे, आनंद चंदनशिवे, अशोक जानराव, जनार्दन शिंदे आदींनी मानवंदना दिली. मोची समाजाच्यावतीने देवेंद्र भंडारे, संजय हेमगड्डी, बसवराज म्हेत्रे, अंबादास करगुळे आदींनी अभिवादन केले. भाजपच्या वतीने अशोक निंबर्गी, जकप्पा कांबळे, डॉ. रफीक सय्यद आदी मानवंदना देण्यासाठी आले होते.

अखिल भारतीय बौध्द महासभेच्या वतीने सलामी

अखिल भारतीय बौध्द महासभा संचलित समता सैनिक दलातर्फे सम्राट चौकातील बुध्दविहार येथून मिरवणूक काढण्यात आली. डॉ. आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सलामी दिली. समता सैनिक दलाच्यावतीने धोंडाबाई नागटिळक व रुक्मिणी सरतापे यांच्या  नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सलामी देत अभिवादन करण्यात आले.

महापालिकेत अभिवादन

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास आणि कौन्सिल हॉल महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस मानवंदना देण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, गटनेता आनंद चंदनशिवे, महिला बालकल्याण सभापती अश्‍विनी चव्हाण, परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलेे.

अस्थिविहार येथे महापालिका आयुक्‍तांनी अभिवादन केले

 बुधवार पेठ   येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील  पुतळ्यास तसेच मिलिंदनगर ,बुधवार पेठ येथील विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अस्थिविहार येथे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, गटनेता आनंद चंदनशिवे, महिला बालकल्याण सभापती अश्‍विनी चव्हाण, परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भरतसिंग बडूरवाले, नगरसेविका ज्योती बमगोंडे, कामिनी आडम, संगीता जाधव, पूनम बनसोडे, परिवहन सदस्य विजय पुकाळे, कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे,  मल्लू सकट, सुरेश लिंगराज, भास्कर सामलेटी, सिध्दू तिम्मीगार, अशोक खडके, शिवप्पा शिवशेट्टी आदी उपस्थित होते.अभिवादनासाठी तरुणाई लोटली

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातील तरुणी व तरुण मोठ्या संख्येने पार्क चौकात दाखल झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  मेणबत्ती लावून अभिवादन केले. पार्क चौकात मोठ्या प्रमाणात तरुण व तरुणी दिसत होते.