Sat, Feb 23, 2019 03:56होमपेज › Solapur › सेतूमधील सर्व्हर डाऊन, बॅलन्स संपला 

सेतूमधील सर्व्हर डाऊन, बॅलन्स संपला 

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:22PMसोलापूर : प्रतिनिधी

 जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात सोमवारी संगणकीय सर्व्हर डाऊन झाल्याने व बॅलन्स नसल्याने या कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले. कामकाजच बंद झाल्याने यावेळी मोठी गर्दी झाली. दिवसभर या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांची मात्र चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आले. 

सेतू कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी नेहमीच गर्दी असते. सेतू कार्यालयाचा संपूर्ण कारभार हा ऑनलाईन केल्याने संगणकीय प्रणालीनेच सगळा कारभार होतो. मात्र सोमवारी अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने व बॅलन्स नसल्याने सेतूचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. 

संगणकीय प्रणालीच बंद असल्याने कर्मचारी खुर्ची रिकामी करुन बाहेर पडले. नागरिकांची मात्र दाखल्यांसाठी भलीमोठी रांग वाढत गेली. या प्रकाराने नागरिक संतप्‍त झाले. सेतू कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी सुरु केलेला ऑनलाईन कारभार चांगलाच आहे. मात्र यात सातत्याने व्यत्यय व अनेक अडचणी येत असल्याने नागरिकांची गैरसोय उलट वाढली आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनीच वेळीच लक्ष घालून सेतू कार्यालयाचा कारभार गतीमान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी येथील नागरिकांनी केली.