होमपेज › Solapur › दुहेरी खूनप्रकरणी शिक्षक पतीस मरेपर्यंत जन्मठेप

दुहेरी खूनप्रकरणी शिक्षक पतीस मरेपर्यंत जन्मठेप

Published On: Mar 08 2018 7:18PM | Last Updated: Mar 08 2018 7:18PMसोलापूर : प्रतिनिधी

हत्तुरे वस्ती येथील दुहेरी खूनप्रकरणात दोषी ठरलेल्‍या शिक्षक पतीसह पाच आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर.व्ही. सावंत-वाघोले यांनी गुरुवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिध्दलिंग पंडित कामोणे (वय 31, रा. मल्लिकार्जुननगर, सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्‍या आरोपीचे नाव आहे. त्‍याला मरेपर्यंत जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली. 

या शिक्षा आरोपीने एकापाठोपाठ भोगावयाच्या आहेत. आरोपी श्रीशैल मडिळप्पा बिराजदार (वय 47, रा. माँसाहेब विडी घरकुल, कुंभारी) यास खूनप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पंडित शिवलिंग कामोणे (वय 65), मंगल पंडित कामोणे (वय 55) यांना संगीताचा छळ केल्याप्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व आरोपींनी मिळून जखमी श्रृती व सारिका यांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने यावेळी दिला आहे. तर, कैलाश पंडित कामोणे (वय 40, सर्व रा. मल्लिकार्जुननगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) हा अद्यापही फरार आहे. त्याच्याविरुध्द अटक केल्यानंतर खटला चालणार आहे.

शिक्षा सुनावलेल्‍या अरोपींनी श्रीदेवी विठ्ठल शेवगार व संगीता सिध्दलिंग कामोणे या माय-लेकींचा खून केला होता, तर श्रृती व सारिका शेवगार यांच्यावर खुनी हल्ला केला होता. याबाबत श्रृती शेवगार हिने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावर येथील न्यायालयात सुनावणी होवून न्यायाधीशांनी हा निकाल सुनावला आहे.