Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पक्षाची पदे असतानाही अनेकांना मिळाली पुन्हा नियोजन समितीवर संधी 

पक्षाची पदे असतानाही अनेकांना मिळाली पुन्हा नियोजन समितीवर संधी 

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 9:03PM सोलापूर : महेश पांढरे  

पक्षाची महत्त्वाची पदे असतानाही सोलापूर जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुन्हा त्यांनाच संधी देण्यात आल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित 11 सदस्यांची यादी नुकतीच शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात येणार्‍या तज्ज्ञ सदस्यपदी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे माढा तालुक्याचे अध्यक्ष संजय कोकाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील, भाजपचे सरचिटणीस विक्रम देशमुख, श्रीकांत देशमुख सांगोला, अण्णासाहेब रुपनवर, शहाजी पाटील सांगोला, शंकर वाघमारे मोहोळ, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून दीपक भोसले यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीपासून पक्षाची विविध पदे असतानाही पुन्हा नियोजन समितीवर त्यांनाच संधी देण्यात आल्याने भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या कोट्यातून शहाजी पवार, शंकर वाघमारे, संजय कोकाटे, श्रीकांत देशमुख, विक्रम देशमुख, शशिकांत चव्हाण यांना संधी देण्यात आली असून यामध्ये पुन्हा सहकारमंत्री आणि पालकमंत्री गटाचे सदस्य निवडण्यात आले आहेत.  शिवसेनेच्या कोट्यातून सांगोल्याचे माजी आ. शहाजी पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रासपकडून अण्णासाहेब रुपनवर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दीपक भोसले यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर काही कार्यकर्त्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.