Sun, Aug 25, 2019 08:15होमपेज › Solapur › पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते यांनी चालविला आयुक्‍तालयाचा कारभार

पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते यांनी चालविला आयुक्‍तालयाचा कारभार

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:25PMसोलापूर : प्रतिनिधी

जागतिक महिलादिनानिमित्त गुरुवारी पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार महिला पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते यांनी चालविला तसेच शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्येही अंमलदार म्हणून महिला कर्मचार्‍यांनीच काम पाहिले.

गुरुवारी सकाळी पोलिस आयक्‍त महादेव तांबडे यांनी आयुक्‍तपदाचा पदभार पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते यांच्याकडे सोपविला. आयुक्‍त तांबडे यांनी गुलाब पुष्प देऊन उपायुक्‍त गिते यांना महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुक्‍त तांबडे यांनी गिते यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. 

महिला कर्मचार्‍यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने जागतिक महिलादिनी ठाणे अंमलदारपदाची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली होती. महिला कर्मचार्‍यांनी उत्साहाने पोलिस ठाण्यांचा कारभार सांभाळला. पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारपदाचा पदभार महत्त्वाचा समजला जातो. दिवसभरात पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणार्‍या घटनांची नोंद केली जाते. फौजदार चावडी, जेलरोड,  सदर बझार, विजापूर नाका, सलगर वस्ती, जोडभावी पेठ, एमआयडीसी पोलिस ठाण्यांमध्ये महिला कर्मचार्‍यांनी ठाणे अंमलदार म्हणून काम केले.  

त्यांच्या कामाबद्दल सन्मान करतो. महिलादिनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे कार्यालयीन  कामकाज सोपवून कामाचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असल्याचे सांगण्यात आले.  पोलिस  ठाण्याचा  कारभार  उत्साहाने सांभाळल्याने महिला   कर्मचार्‍यांचे धाडस वाढले आहे. दवाखाना नोंदी, किरकोळ गुन्ह्यांच्या नोंदी आणि लाच प्रकरणातील जुन्या गुन्ह्याची नोंद स्टेशन डायरीला केली. महिलादिनी सर्वांकडून  सन्मान मिळाला असल्याचे महिला कर्मचार्‍यांनी सांगितले.