Fri, Apr 26, 2019 19:43होमपेज › Solapur › देशातील विविधता म्हणजे लोकशाहीचा आत्मा : गणेश देवी

देशातील विविधता म्हणजे लोकशाहीचा आत्मा : गणेश देवी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

दमाणी-पटेल कर्मयोगी पुरस्काराचे थाटात वितरण झाले. यावेळी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे  व ज्येष्ठ  साहित्यिक  गणेश देवी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.पुरस्काराच्या समारंभावेळी गणेश देवी यांनी आपल्या मनोगतामधून   लोकशाहीचा मार्ग दाखविला.देशातील विविधता हीच भारताचा आत्मा आहे. तो आत्मा टिकवणे गरजेचे आहे, असे मत देवी यांनी मांडले.

दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. देवी व मकरंद अनासपुरे यांना कर्मयोगी पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होतेे. उद्योजक बिपीनभाई पटेल, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.  दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या कर्मयोगी पुरस्कार वितरणाचे हे तिसरे वर्ष आहे.  बिपीनभाई पटेल यांनी प्रास्ताविक केले.  अनासपुरे यांनी विनोदी किस्से सांगून सभागृहाचे मनोरंजन केले.  वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्योती वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

मकरंद अनासपुरे यांनी मिळालेली पुरस्काराची रक्कम 51 हजार रुपये पारधी  मुलांच्या शाळेला मोहोळ येथील ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या भारतमाता आदिवासी आश्रमशाळेस दिली. ज्ञानेश्‍वर भोसले यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ही रक्कम देण्यात आली.


  •