Sun, Nov 18, 2018 07:05



होमपेज › Solapur › नीरा, भीमा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

नीरा, भीमा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Published On: Aug 20 2018 8:13PM | Last Updated: Aug 20 2018 8:13PM



बोंडले: विजयकुमार देशमुख.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाचे असलेल्या नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पाऊसा मुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर व नीरा-देवधर या धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग वीर धरणात येत आहे. या येणार्‍या विसर्गामुळे वीर धरणामधून दि.१७  ऑगस्ट पासून नीरा नदीत विसर्ग सोडण्यात येत असून हा विसर्ग कमी जास्त केला जात आहे.

नीरा खोर्‍यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर धरणामधून ७ हजार ६२ क्युसेस तर नीरा-देवधर धरणामधून ७ हजार ९३८ क्युसेस विसर्ग सोडला जात आहे. हा सर्व विसर्ग वीर धरणात येत असल्यामुळे  काल दुपारी ३ वाजता वीर धरणामधून सोडला जाणारा विसर्ग वाढवून १३ हजार ९११ क्युसेस विसर्ग करण्यात आलेला होता. परंतु नीरा-देवधर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे तसेच वीर धरणात येणारा विसर्ग वाढलेला असल्यामुळे वीर धरणामधून नीरा नदीत सोडण्यात येत असलेल्या विसर्गात काल सायंकाळी ५ वाजता पुन्हा वाढ करण्यात आली असून तो २३ हजार १८५ क्युसेस करण्यात आला आहे.

नीरा-देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे व वीर धरणात येणार्‍या विसर्गाचा विचार करून वीर धरणामधून नीरा नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अभियंता, वीर धरण यांच्याकडून तहसिलदार खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, पुरंदर, बारामती व इंदापूर यांना संबंधित कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या लोकांना सावधनतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे, उपविभागीय अभियंता, अजित जमदाडे यांनी दै.पुढारी ला दिली.

 भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणाची आकडेवारी खालील प्रमाणे

भाटघर 
पाणी पातळी ६२३.२८ मी.,
एकुण साठा ६७२.६५ द.ल.घ.मी.,
उपयुक्त साठा ६६५.५७ द.ल.घ.मी.,
टक्केवारी  १००%,
उपयुक्त साठा २३.५० टीएमसी.
विसर्ग ७ हजार ६२ क्युसेस.

निरा देवधर

पाणी पातळी ६६७.१० मी.,
एकुण साठा ३३७.३८ द.ल.घ.मी.,
उपयुक्त साठा ३३२.१२ द.ल.घ.मी.,
टक्केवारी  १००%,
उपयुक्त साठा ११.७३ टीएमसी.
विसर्ग ७ हजार ९३८ क्युसेस.

वीर

पाणी पातळी ५७९.८५ मी.,
एकुण साठा २७८.४९ द.ल.घ.मी.,
उपयुक्त साठा २६६.४० द.ल.घ.मी.,
टक्केवारी १००%,
उपयुक्त साठा ९.४१ टीएमसी.
विसर्ग २३ हजार १८५ क्युसेस