होमपेज › Solapur › सोलापुरात १६ व्यापारी गाळे चोरट्यांनी फोडले

सोलापुरात १६ व्यापारी गाळे चोरट्यांनी फोडले

Published On: May 17 2018 10:40AM | Last Updated: May 17 2018 10:39AMपानीव : वार्ताहर

यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर असणारे १६ व्यापारी गाळे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे तीस ते पस्तीस हजार रोकड चोरण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.