Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Solapur › लाखमोलाचे गाळे; कवडीमोल भाडे! 

लाखमोलाचे गाळे; कवडीमोल भाडे! 

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 08 2018 12:07AMसोलापूर : दीपक होमकर 

सोलापूर शहरातील हार्ट ऑफ सिटी समजल्या जाणार्‍या पार्क मैदानाच्या स्टेडियमलगतच्या व्यापारी गाळ्यांना बाजारभावाप्रमाणे भाडे सुमारे 50 ते 60 रुपये प्रतिचौरस फुटांपेक्षाही अधिक असताना महापालिकेच्या गाळेधारकांना मात्र केवळ 7.89 रुपये प्रतिचौरस फूट इतकेच भाडे आकारले जाते. त्यामुळे 445.31 चौरस फुटांच्या या भल्यामोठ्या गाळ्यांसाठी फक्त 3 हजार 517 रुपये भाडे येथील व्यापारी मनपाकडे भरतात. इतक्या मोठ्या बाजारपेठेतील हार्ट ऑफ सिटी असलेल्या या परिसरात कवडीमोल भाडेपट्ट्याने व्यापार्‍यांना गाळे दिल्याचे महापालिकेच्याच नोंदीनुसार स्पष्ट झाले आहे.
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये इंदिरा गांधी स्टेडियम आहे. या स्टेडियमच्या बाहेरील बाजूस तब्बल 59 दुकान गाळे आहेत. त्यामध्ये 13 गाळे हे सर्वाधिक 445.31 फुटांचे आहेत. त्यांना केवळ दरमहा 3517 रुपये इतके भाडे आकारले जात आहे. कहर म्हणजे 2012 पूर्वी त्यांना केवळ 546 रुपये इतकेच भाडे आकारले जात होते. येथील सर्वात छोटा गाळा 85 चौरस फुटांचा असून, त्याला दरमहा 808 रुपये भाडे आकारले जात आहे. याचठिकाणी खासगी गाळेधारक मात्र मात्र तब्बल 20 हजार रुपयांप्रमाणे गाळे भाड्याने देत आहेत, तर महापालिका मात्र केवळ 3215 रुपये भाडे आकारत आहे. त्यामुळे महापालिकेला या गाळ्यातून दर महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महापालिकेच्या इतर ठिकाणच्या गाळ्यांची मुदत संपल्याने तेथे ई-टेंडर पध्दतीने गाळे भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्यावर 30-30 वर्षे कवडीमोल भाडे भरणार्‍या व्यापार्‍यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र त्याला कोणतीही भीक न घालता आयुक्तांनी टेंडरची प्रक्रिया सुरु केल्याने व्यापार्‍यांनी आता ‘सोलापूर बंद’ची हाक दिली आहे. त्याला विरोधी पक्षानेही साथ दिली असल्याने हा वाद चिघळला आहे. 

अनुक्रमांक, गाळेधारकाचे नाव (कंसात चटई क्षेत्र चौरस फुटात) आणि दरमहा भाडे रुपयांत या क्रमाने गाळ्यांचा तपशील असा ः 1) नारायण लोमटे (445.31)- 3517 रु., 2) प्रदीप सलगर (445.31) - 3517 रु., 3) विजयकुमार गुमडेल  (445.31)- 3517 रु.,  4) इरपण्णा गुमडेल  (445.31)- 3517 रु., 5) किरण यज्जा  (445.31)- 3517 रु., 6) बुलबुले ब्रदर्स  (445.31)- 3517 रु., 7) दीपक रणसुभे  (445.31)- 3517 रु., 8) अनिल सिंदगी  (445.31)- 3517 रु., 9) जयंत जागाणी  (445.31)- 3517 रु., 10) सतीश बिद्री  (445.31)- 3517 रु., 11) असोसिएटस् ट्रेडर्स  (445.31)- 3517 रु., 12) कृष्णा मंगजी  (445.31)- 3517 रु., 13) महावीरचंद कोठारी  (445.31)- 3517 रु., 14) डॉ. सी.एच. छंत्र (415.78) 3285 रु., 15) सत्यनारायण दुरुगकर  (415.78 ) 3285 रु., 16) किसनदास आणि दीपक पहुजा (415.78 ) 3285 रु., 17) सतीश भोसले (415.78) 3285 रु., 18) भंवरदास बुधारिया (415.78) 3285 रु., 19) लाडले अंसरसाब शेख (415.78) 3285 रु., 20) शीतल इलेक्ट्रिक कंपनी (415.78) 3285 रु., 21) मक्सुदखान मसूदखान (415.78) 3285 रु., 22) रमाकांत जन्नू (415.78) 3285 रु., 23) नंदकिशोर तिवाडी (126.99) 1615 रु., 24) नंदकिशोर तिवाडी (126.99) 1615 रु., 25) म. रफीक अहमद बागवान (85) 808 रु., 26) शोभा उदय निशाणदार (133) 990 रु., 27) मे. मीरा ग्रुप गुलबर्गा (134) 996 रु. , 28) मे. मीरा ग्रुप गुलबर्गा (232) 1725 रु., 29) मे. मीरा ग्रुप गुलबर्गा (247. 44) 1840 रु., 30) मे. मीरा ग्रुप गुलबर्गा (247. 44) 1840 रु., 31) मे. मीरा ग्रुप रेमण्ड गुलबर्गा (247.44) रु. 1840 रु., 32) असद इस्माईल सैपन (412) 3062  रु., 33) श्रीनिवास गोयल (413) 3070 रु., 34) शिरीषकुमार अय्यंगार (247) 1840 रु., 35) श्रीनिवास गाली (247.78) 1147 रु., 36) केतन शहा (240.48) 1400 रु., 37) कौशिक शहा (240.48) 1400 रु., 38) पोपट रामचंद्र दुर्गे  (240.48) 1788 रु., 39) देवीदास रा. पिसे  (412) 3063 रु., 40) जयंत दळवी (410) 3050 रु , 41) नॅब संस्था (285) 2118 रु., 42) अरविंद मैलापुरे (334.88) 2490 रु., 43) अरविंद मैलापुरे (334.88) 2490 रु., 44) अरविंद मैलापुरे (334.88) 2490 रु., 45) अरविंद मैलापुरे (334.88) 2490 रु., 46) अरविंद मैलापूरे ( 317.25) 2358 रु., 47) अरविंद मैलापुरे (317.25) 2358 रु., 48) अरविंद मैलापुरे (317.25) 2358 रु., 49) अरविंद मैलापुरे (317.25) 2358 रु., 50) खादी ग्रामोद्योग (222.89) 1657 रु, 51) खादी ग्रामोद्योग (226.06) 1680 रु., 52) खादी ग्रामोद्योग (232.58) 1732 रु., 53) क्लासिक शूज (233.85) 1738 रु., 54) सो. जि. सह. दूध विक्री केंद्र (228.76) 1710 रु., 55) सो.जि.सह. दूध विक्री केंद्र (228.76) 1710 रु., 56) सुमधूर एंटरप्रायझेस (200) 1487 रु., 57) मल्लम्मा सलगर (232) 1725 रु., 58) स्टेप इन कलेक्शन (227) 1688 रु., 59) श्रीनिवास चव्हाण (160.50) 1193 रु.

59 गाळ्यांपोटी दरमहा 1 लाख 46 हजार 205 रु. भाडे
महापालिकेच्या मालकीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये एकूण 59 गाळे आहेत. त्यातील बहुतांश गाळ्यांना त्यांच्या ठिकाणानुसार व एकूण जागेनुसार कमी-अधिक भाडे आकारण्यात आले आहे. त्या सर्व गाळ्यांचे एकूण भाडे केवळ 1 लाख 46 हजार 205  प्रतिमहिना इतके होते. 2012 मध्ये बुहतांश गाळ्याला हजार रुपयांपेक्षा कमी भाडे होते. त्यामध्ये वाढ सुमारे हजार-दोन हजारने वाढ करून पाच वर्षे उलटली तरी केवळ साडेतीन हजारांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. इतक्या कमी पैशामध्ये ना स्टेडियमची देखरेख होते ना पार्क मैदानाची निगा राखली जाऊ शकते.