Mon, Jun 17, 2019 02:42होमपेज › Solapur › महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने

महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 9:28PMसोलापूर : प्रतिनिधी

  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईविरोधात दक्षिण युवक काँग्रेसच्यावतीने आसरा चौक व भारती विद्यापीठजवळील चैतन्य भाजी मार्केट येथे निदर्शने करत सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात  आली. भर चौकात आंदोलन असल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हे आंदोलन करण्यात दक्षिण काँग्रेसमधील सैफन शेख व महेश घाडगे यांनी पुढाकार घेतला होता.
माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे पदाधिकारी व माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले की, सध्या पेट्रोल, डिझेल, गॅसची प्रचंड दरवाढ झाली आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत.वाढत्या महागाईमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाहनचालकांना, माल वाहतूकदारांना मोेठा फटका बसत आहे. या दरवाढीमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे.

या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर दक्षिण युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आसरा चौक येथे व त्यानंतर  अकरा वाजण्याच्या सुमारास विजापूर रोड येथील चैतन्यनगर भाजी मार्केट भारती विद्यापीठजवळ सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रकाश वाले, विनोद भोसले, इंदुमती अलगोंडा-पाटील, तौफिक हत्तुरे, बाबा मिस्त्री, अंबादास करगुडे, सुदीप चाकोते, विवेक कन्ना, राहुल वर्धा, राहुल गोयल, जीशान सय्यद, जावीद कुरेशी, विशाल गायकवाड, सोहेल पटेल, नूरअहमद नालवार, संजय गायकवाड, अझहर शेख, प्रवीण जाधव, वसीमराजा शेख, समीर काझी, अनिल वाघमारे, मन्सूर शेख, चंद्रकांत सुर्वे, सौरभ साळुंखे, इरफान शेख, सोहेल चौधरी, शैलेश वाघमारे, अभिषेक कटके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.